मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

‘मी इथला इंचार्ज आहे…’; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने दिव्यांग पोलीस शिपायाला आईवरून दिली घाणेरडी शिवीगाळ; पोलीस दलात खळबळ कारवाई होणार का ?

---Advertisement---

अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):
Bhingar Camp Police Station पोलीस ठाण्यात शिस्त आणि आदराची अपेक्षा असताना, अहिल्यानगरमधील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एका दिव्यांग पोलीस शिपायाला त्याच्याच सहकारी पोलीस हवालदाराने अत्यंत नीच पातळीवर जाऊन आईवरून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “मी इथला इंचार्ज आहे,” अशी अरेरावी करत, जमावासमोर दिव्यांग कर्मचाऱ्याचा अपमान केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पीडित शिपायाने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.

काय आहे सविस्तर प्रकरण?

वैभव मच्छिंद्र झिने हे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. झिने हे दिव्यांग असून २०११ पासून पोलीस दलात सेवा देत आहेत. त्यांच्या तक्रार अर्जानुसार, २९ मार्च २०२६ रोजी ते पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी आणि इतर संगणकीय कामे करत होते.

त्याचवेळी, माधवबाग भागातील ५० ते ६० लोकांचा जमाव मारहाणीच्या तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल (हवालदार) नंदकुमार पठारे यांनी शिपाई झिने यांना मेडिकल मेमो टाईप करण्यास सांगितले.

नेमका वाद कशामुळे झाला?

शिपाई झिने यांनी संगणकावर मेडिकल मेमो टाईप केला आणि तो प्रिंट करण्यासाठी कमांड दिली. मात्र, प्रिंटरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने प्रिंट निघाली नाही. हा कोणताही झिने यांचा दोष नव्हता. मात्र, जमावासमोर विलंब होत असल्याचे पाहून हवालदार नंदकुमार पठारे यांचा संयम सुटला.

हवालदार पठारे यांनी भर जमावासमोर शिपाई झिने यांना उद्देशून, “तुला जमत नसेल तर तुझी आय ***” अशा अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या भाषेत आईवरून शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, “मी आय एम इंचार्ज इन पोलीस स्टेशन” (मी या पोलीस स्टेशनचा इंचार्ज आहे) असे म्हणत अरेरावी केली आणि त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

पीडित शिपायाची कैफियत

दिव्यांग असतानाही आपण आपली कर्तव्ये चोख बजावत असून आजवर कोणतीही तक्रार नाही, असे झिने यांनी अर्जात म्हटले आहे. मात्र, हवालदार पठारे याने सर्वांसमोर आईवरून दिलेल्या घाणेरड्या शिवीगाळीमुळे आपली मानसिक स्थिती अत्यंत खालावली असून, आपल्याला प्रचंड अपमानित वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर झिने यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली आणि रजा घेऊन घरी निघून गेले.

कडक कारवाईची मागणी

पोलीस दलात राहून सेवा शर्तींचा भंग करणाऱ्या आणि दिव्यांग कर्मचाऱ्याचा मानभंग करणाऱ्या हवालदार नंदकुमार पठारे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी लावून शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस शिपाई वैभव झिने यांनी केली आहे.

यांना पाठवल्या तक्रारीच्या प्रती

या घटनेची गंभीर दखल घेत पीडित शिपायाने आपल्या तक्रार अर्जाच्या प्रती माहिती व योग्य कार्यवाहीसाठी खालील वरिष्ठ कार्यालयांना सादर केल्या आहेत:
१. माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.
२. माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य.
३. माननीय आयजी साहेब (विशेष पोलीस महानिरीक्षक), नाशिक विभाग.
४. माननीय जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.
५. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अहिल्यानगर.
६. सहाय्यक पोलीस निरीक्षक, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पदभार स्वीकारल्यापासून कॅम्प हद्दीतील अवैध धंदे व गुन्हेगारीला चांगलाच आळा बसलेला आहे परंतु काही अशा ठराविक वादग्रस्त अंमलदारांमुळे पोलीस स्टेशनचे नाव अत्यंत खराब होताना दिसत आहे. तसेच या प्रकरणामुळे पोलीस दलातील अंतर्गत शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता जिल्हा पोलीस अधीक्षक या मुजोर हवालदार नंदकुमार पठारेवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

अधिक वाचा

Leave a Comment