Middle East Crisis Economy जर तुम्ही विचार करत असाल की इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा तुमच्याशी काय संबंध, तर सावधान! या युद्धाचा बॉम्ब थेट तुमच्या घराच्या बजेटवर फुटला आहे. आता बिस्किटाच्या पुड्यापासून ते अंगाच्या साबणापर्यंत सगळंच तुमच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.
Table of Contents
बजेट कोलमडणार, महागाईचा भडका!
जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याचा थेट परिणाम म्हणून FMCG कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे.
- खाद्यतेल महागले: खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर ४ ते ५ रुपयांची वाढ आधीच झाली आहे. ब्रिटानिया, नेस्ले आणि बिकाजी सारख्या मोठ्या कंपन्या लवकरच त्यांच्या किमती वाढवणार आहेत.
- साबण आणि सौंदर्य प्रसाधने: पाम ऑईलच्या किमती वाढल्याने HUL आणि गोदरेज सारख्या कंपन्यांचे साबण आता महाग मिळणार आहेत.
- कंपन्यांची ‘कात्री’ चालली: सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक कंपन्या किमती न वाढवता पाकिटातील वस्तूचे वजन कमी करत आहेत. म्हणजे पैसे तेवढेच, पण वस्तू कमी!

घराला रंग देणं आता स्वप्नच?
केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूच नाही, तर पेंट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही महागणार आहेत. एशियन पेंट्स, बर्जर आणि नेरोलॅक यांसारख्या कंपन्यांनी ६ ते ८ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. टीव्ही आणि रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार असेल, तर तो आताच पूर्ण करा, कारण उद्या खिसा रिकामा होण्याची वेळ येऊ शकते.
युद्धाची झळ आता प्रत्येक घराघरात पोहोचली असून मध्यमवर्गीयांचे टेन्शन वाढले आहे. अशाच नवनवीन आणि वेगवान अपडेट्ससाठी पाहत राहा ‘अहिल्यानगर टुडे’.





