महाराष्ट्र राजकीय अहिल्यानगर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड

अहिल्यानगरच्या मातीत साकारलेला ‘क्रांती’ चित्रपट १६ ऑक्टोबरला राज्यभर प्रदर्शित होणार

डॉ. अर्जुन शिरसाठ यांचे चित्रपट निर्मितीत पदार्पण; प्रियंका खोलगडे प्रमुख भूमिकेत, ॲड. महेश देवकाते साकारणार कडकशेठ

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या कलाविश्वातून साकारलेला ‘क्रांती’ हा मराठी चित्रपट येत्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून शहरातील स्थानिक कलाकारांना मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली असून, नेत्रतज्ज्ञ डॉ. अर्जुन आनंद शिरसाठ चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत, संकलन, दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी डॉ. शिरसाठ यांनी सांभाळली आहे. मुंबईच्या अभिनेत्री प्रियंका खोलगडे यांनी चित्रपटात ‘क्रांती’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे. तर ॲड. महेश देवकाते ऊर्फ पत्री सरकार हे ‘कडकशेठ’ या खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून रमेश चौधरी यांनी काम पाहिले आहे. ‘पाणीपुरी’, ‘सालबर्डी’, ‘गुल्हेर’ आणि ‘बाबो’ या चित्रपटांमुळे ते परिचित आहेत.

स्त्रीच्या संघर्षाची आणि न्यायाची कथा

‘क्रांती’ या चित्रपटातून अत्याचारामुळे पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या आयुष्यावर होणारे परिणाम मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने उभे राहणे, स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवणे आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणे, अशी या चित्रपटातील नायिकेची व्यक्तिरेखा आहे.

महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर आणि प्रभावी कायद्यांची गरज हा चित्रपटातील महत्त्वाचा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ घेत, गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध प्रभावी कायदेशीर तरतुदी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या प्रश्नावर चित्रपट भाष्य करतो.

अहिराणी गाणे ठरणार आकर्षण

‘क्रांती’ चित्रपटात अहिराणी भाषेतील गाण्याचाही समावेश करण्यात आला आहे. “मान्ही बायको बायको बायको, बायको देखणा दिवा..!!” हे गाणे प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात अशा प्रकारे अहिराणी गाण्याचा समावेश प्रथमच होत असल्याचा दावा डॉ. शिरसाठ यांनी केला आहे.

अहिल्यानगर परिसरात चित्रीकरण

या चित्रपटाचे चित्रीकरण अहिल्यानगर परिसरातील विविध ठिकाणी करण्यात आले. न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज, विळद घाट, प्रहार अकॅडमी, मांजरसुंबा तसेच डॉ. सुंदर गोरे आणि राजूशेठ घुले यांच्या निवासस्थानी चित्रपटाचे काही भाग चित्रित करण्यात आले आहेत.

चित्रपटात ज्येष्ठ कलाकार माधव अभ्यंकर आणि पुष्पा चौधरी यांच्यासह अहिल्यानगरमधील कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत. श्याम शिंदे, डॉ. तुषार दराडे, पल्लवी शेटे, तेजस आंधळे, राहुल सुराणा, शुभम् निर्मल, अक्षदा वर्मा, साक्षी दरेकर आणि अतुल यांचा कलाकारांमध्ये समावेश आहे.

दिवंगत पुत्राच्या स्वप्नातून चित्रपट निर्मितीचा प्रवास

‘क्रांती’च्या निर्मितीमागे डॉ. अर्जुन शिरसाठ यांची भावनिक प्रेरणा आहे. त्यांचे दिवंगत पुत्र अभिषेक याला लहानपणापासून चित्रपट निर्मितीची आवड होती. चित्रपट पाहताना तो केवळ कथानकावर लक्ष केंद्रित न करता कॅमेऱ्याचे अँगल, दृश्यांची मांडणी, एडिटिंग आणि ट्रान्झिशन यांसारख्या तांत्रिक बाबींचेही बारकाईने निरीक्षण करत असे.

अभिषेकने पियानोचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले होते. संगीताच्या पाच परीक्षा उत्तीर्ण केलेल्या अभिषेकला चित्रपटांतील संगीताचीही जाण होती. त्याच्या लेखनकौशल्याची झलक शालेय जीवनातही पाहायला मिळाली होती. मात्र, वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्याचे अपघाती निधन झाले. त्याच्या आठवणींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुढे नेण्याच्या भावनेतून डॉ. शिरसाठ यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.

वाचनाची आवड आणि कलाक्षेत्राशी नाते

डॉ. शिरसाठ यांच्या जडणघडणीत वाचनसंस्कारांचाही मोठा वाटा आहे. वडील कै. आनंदराव अमृतराव शिरसाठ यांनी त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण केली. रणजित देसाई यांची ‘श्रीमान योगी’, विश्वास पाटील यांची ‘छावा’ आणि ‘पानिपत’, ‘राऊ’, शिवाजी सावंत यांची ‘युगंधर’ आणि ‘मृत्युंजय’ यांसह विविध साहित्यकृतींचे वाचन त्यांनी केले. इतिहास, साहित्य, संगीत आणि चित्रपटांविषयीची आवड त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही जपली.

अहिल्यानगरमधील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘क्रांती’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक परिसरात चित्रीकरण, स्थानिक कलाकारांचा सहभाग आणि सामाजिक विषयाची मांडणी यांमुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. येत्या १६ ऑक्टोबरला हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

अधिक वाचा

Ahilyanagar Unseasonal Rain

अहिल्यानगरमध्ये अवकाळीचा हाहाकार: फळबागांना मोठा फटका, शेतकरी हवालदिल

ऑनलाईन पेमेंटच्या नियमांत उद्यापासून मोठा बदल! १ एप्रिलपासून तुमचे डिजिटल व्यवहार होणार अधिक सुरक्षित; जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar Baramati Plane Crash

Ajit Pawar Baramati Plane Crash उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन

Ahmednagar Maliwada issue

Ahilyanagar heritage gate removal धक्कादायक! अहिल्यानगरची ५०० वर्षांची शान मातीमोल होणार? प्रशासनाच्या निर्णयामुळे पेटला माळीवाडा आयुक्तांविरोधात संतापाचा वणवा!

Ahilyanagar: Sonai हादरली जातीय गुन्ह्याने..आंबेडकरी,मातंग व बहुजन समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार 

Ahilyanagar Rain Update

Ahilyanagar Rain Update अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Leave a Comment