Ahilyanagar news अहिल्यानगर शासनाचा कोणताही परवाना नसताना भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्याजवळ बाळगून लोकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता असताना गॅस टाकीतून गॅस काढून अन्य वाहनात भरणाऱ्या २ अवैध रिफिलिंग सेंटरवर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत गॅस टाक्या, ओमिनी व्हॅन, दोन पॅगो रिक्षा, रिफिलिंग मशीन असा ३ लाख ६२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील स्टेशन रोडवरील खालकर हॉस्पिटल समोर पत्र्याच्या शेडमध्ये आणि स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळील रिफिलिंग सेंटरवर शुक्रवारी (दि.२०) दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खालकर हॉस्पिटल समोर पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्या जवळ बाळगून टाकीतून गॅस काढून तो एलपीजी वाहनात रिफिलिंग करीत आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांना माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथकास पाठवून कारवाईच्या सुचना दिल्या. पोलिसांनी अचानक तेथे छापा टाकला असता त्या ठिकाणी एक इसम पांढऱ्या रंगाचे ओमेनी व्हॅन व पॅगो रिक्षा या वाहनात रिफिलींगच्या मोटारमशीनसह वजन काट्यावर घरगुती गॅस टाकी उलटी करुन त्यामधून ओमेनी व्हॅनमध्ये व रिक्षात गॅस भरताना मिळून आला. घरगुती गॅस टाक्या वापरण्याचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने असा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळावरुन सुमारे ३० हजार रुपये किमतीची गॅस रिफिलिंग मशीन, ४५ हजार ५०० रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या १३ सीलबंद घरगुती वापराच्या गॅस टाक्या, सुमारे ३ हजार ५०० रुपये किमतीची