Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Ahilyanagar Today
    Ahilyanagar Today
    Home»Ahilyanagar»Ahilyanagar News :11 किलो गांज्यासह 13.70 लाखांचा मुद्देमाल जप्त — अहिल्यानगर LCB ची मोठी कारवाई
    Ahilyanagar

    Ahilyanagar News :11 किलो गांज्यासह 13.70 लाखांचा मुद्देमाल जप्त — अहिल्यानगर LCB ची मोठी कारवाई

    Ahilyanagar TodayBy Ahilyanagar TodaySeptember 25, 2025No Comments2 Mins Read
    Share WhatsApp Facebook Twitter Pinterest Telegram LinkedIn Tumblr Email Copy Link
    Share
    WhatsApp Facebook Twitter

    अहिल्यानगर, दि. 24 सप्टेंबर 2025

    अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अंमली पदार्थ विक्रीविरोधात मोठी कारवाई करत 11.083 किलो गांजा आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 13 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींपैकी चार जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.

    ही कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. या मोहिमेसाठी नियुक्त नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाथर्डी परिसरात गुप्त तपास करत होते.

    तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,
    सतीष सुरेश डोळस, राकेश सुदाम वाळुंज, आकाश देविदास जंगम, आणि सतीष कृष्णकुमार बिडलांग हे चार आरोपी शेवगाव येथील सुरज आसराजी छाजेड याच्याकडून गांजा खरेदी करून पाथर्डी मार्गे पुण्याकडे विक्रीसाठी जात आहेत.

    त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मिळून माळी बाभुळगाव फाटा येथे सापळा रचला. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (MH-12-JZ-1854) गाडी थांबवून झडती घेतली असता, गाडीच्या डिकीमध्ये निळ्या रंगाची बॅग आढळून आली. ही बॅग उघडून पाहिल्यावर त्यामध्ये दोन मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यांत गांजासदृश्य हिरवट रंगाचा उग्र वास येणारा पदार्थ मिळाला.

    विचारणा केल्यानंतर आरोपी सतीष डोळस याने कबुली दिली की, हा गांजा शेवगाव येथील सुरज छाजेड याच्याकडून खरेदी करण्यात आला असून, विक्रीसाठी पुण्याकडे नेत असल्याचे सांगितले.

    या कारवाईत पोलिसांनी 11.083 किलो गांजा, तसेच काळी स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 13,70,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेले आरोपी असे —

    1. सतीष सुरेश डोळस, वय 27, रा. कान्हेफाटा, मावळ, पुणे
    2. राकेश सुदाम वाळुंज, वय 35, रा. कामशेत, मावळ, पुणे
    3. आकाश देविदास जंगम, वय 29, रा. कामशेत, मावळ, पुणे
    4. सतीष कृष्णकुमार बिडलांग, वय 33, रा. कारला, मावळ, पुणे

    तर सुरज आसराजी छाजेड, रा. बालमटाकळी, शेवगाव हा आरोपी सध्या फरार आहे.

    या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 1103/2025 अन्वये NDPS Act 1985 च्या कलम 8(क), 20(ब), II(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरणकुमार कबाडी, आणि पाथर्डी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    या ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या जाळ्यावर मोठा आघात बसला आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter
    Next Article Ahilyanagar RTO मधील धक्कादायक कारवाई! महिला मोटार वाहन निरीक्षकावर लाच प्रकरणात गुन्हा
    Ahilyanagar Today
    • Website

    Related Posts

    Ajit Pawar Baramati Plane Crash उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन

    January 28, 2026

    Ahilyanagar heritage gate removal धक्कादायक! अहिल्यानगरची ५०० वर्षांची शान मातीमोल होणार? प्रशासनाच्या निर्णयामुळे पेटला माळीवाडा आयुक्तांविरोधात संतापाचा वणवा!

    December 13, 2025

    Ahilyanagar: Sonai हादरली जातीय गुन्ह्याने..आंबेडकरी,मातंग व बहुजन समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार 

    October 24, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Ahilyanagar Today

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.