Author: Ahilyanagar Today

Ajit Pawar Baramati Plane Crash बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झाले. राज्याच्या राजकारणात ‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नेमकं काय घडलं? उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघाले होते. त्यांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत असतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. लँडिंगच्या वेळीच विमानाचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये विमानाचे अक्षरशः तुकडे झाले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की विमानाच्या स्थितीवरूनच आतील प्रवासी बचावणे कठीण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुर्दैवी…

Read More

अहिल्यानगर:Ahilyanagar heritage gate removal  ऐतिहासिक वारसा आणि शौर्याची परंपरा लाभलेल्या अहिल्यानगर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. शहराची ओळख असलेली आणि गेल्या ५०० वर्षांपासून इतिहासाची साक्ष देणारी ‘माळीवाडा वेस’ पाडण्याचा घाट महानगरपालिका प्रशासनाने घातला आहे. प्रशासनाच्या या एका निर्णयाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, माळीवाडा परिसरात जनआक्रोशाचा ज्वालामुखी फाटला आहे. “आमची वेस, आमची ओळख” असे म्हणत हजारो नागरिक आता रस्त्यावर उतरले असून प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. नेमका वाद काय? अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील वाहतुकीचे किंवा विकासाचे कारण पुढे करत ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी प्रशासनाने हरकती देखील मागवल्या आहेत. मात्र, ही वेस म्हणजे केवळ दगड-मातीचे…

Read More

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- Sonai सोनई येथे 19 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी, मातंग आणि बहुजन समाजाच्या प्रतिनिधींकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले.सोनई येथील स्वामी विवेकानंद चौकात रात्रीच्या सुमारास मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर काही समाजकंटकांनी अमानुष मारहाण केली. त्यास उचलून नेऊन त्याच्या पायावर चारचाकी वाहन चढविण्यात आले.तसेच लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी निर्दयपणे मारहाण करून एका डोळ्यात चाकू खुपसण्यात आला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्या तरुणाच्या तोंडावर व अंगावर लघुशंका करून अत्यंत घृणास्पद प्रकार केला.या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.निवेदनात आरोपींची नावे संभाजी…

Read More

अहिल्यानगर, दि. 25 सप्टेंबर 2025 Ahilyanagar Rain Update भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात 26 आणि 28 सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ घोषित केला आहे. मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यामुळे काही ठिकाणी पाणी साचणे, नाल्यांमध्ये पाणी वाढणे, तसेच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना सूचना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खालील सूचना व खबरदारीचे उपाय दिले आहेत: जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

अहिल्यानगर, दि. 24 सप्टेंबर 2025 अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) मोठी सापळा कारवाई करण्यात येऊन 3000 रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम इस्माईल पठाण याला रंगेहात पकडण्यात आले. ही लाच प्रकरणातील मुख्य आरोपी महिला मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गीता भास्कर शेजवळ (वर्ग 1) असून, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर युनिटच्या पथकाने केली असून, नागरिकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारीचे स्वरूप 65 वर्षीय तक्रारदार हे मौजे पाटस येथून श्री सिमेंट कंपनीची ओव्हरलोड सिमेंट वाहतूक करणारी गाडी चालवतात.22 सप्टेंबर 2025 रोजी ते अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले असता,मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गीता शेजवळ…

Read More

अहिल्यानगर, दि. 24 सप्टेंबर 2025 अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अंमली पदार्थ विक्रीविरोधात मोठी कारवाई करत 11.083 किलो गांजा आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 13 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींपैकी चार जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे. ही कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. या मोहिमेसाठी नियुक्त नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाथर्डी परिसरात गुप्त तपास करत होते. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,सतीष सुरेश डोळस, राकेश सुदाम…

Read More